मुंबई पोलिसांचे आभार!
तर आज पुन्हा एकदा मला पोलिसांना फोन करावा लागला. वर्षातून एकदा तरी ही वेळ येतेच. कारण म्हणजे कानठळ्या बसवणारा सार्वजनिक मंडळांचा लॉउडस्पिकर, जो गेले १० दिवस सुरूच आहे. पण आज सकाळी मात्र त्याच्या आवाजाने उच्चांक गाठला. म्हणून मी हेल्पलाईनला कॉल केला.
मी: नमस्कार, आज अनंत चतुर्दशी आहे, तरीही कृपया बाजूच्या मंडळांना स्पिकरचा आवाज कमी करायला सांगावे.
१००: मंडळाचा पत्ता सांगा.
मी: पत्ता असा..
१००: पाठवते.
(आपलं नावगाव सांगायची गरज नाही.)
१० मिनिटात आवाजाने निच्चांक गाठला. 🙂 फक्त हिंदी सिनेमात पोलिस उशिरा येतात. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवात पोलिसांनी त्वरित रिझल्ट दिला आहे. थोड्या वेळात मला पोलिस कंट्रोल नंबरवरून कॉल आला.
१००: पोलिस आले होते का?
मी: ते माहित नाही, पण आवाज लगेच कमी झाला. थँक यु वेरी मच.
१००: ठीक आहे.
पडताळणीचा कॉल येणं.. ह्यावेळेस हे नवीन होतं. 🙂
सोशल मीडियावर जाहीर टिका खूप असतात. पण कौतुक हे जास्त केलं गेलं पाहिजे म्हणून हे लिहिलं.
मुंबई पोलिसांना मनापासून धन्यवाद _()_
To my non-Marathi reading/speaking friends, the moral of the story is ‘Dial 100 without any fear and the Mumbai Police will be there’ 🙂
गणपती बाप्पा मोरया!
PC: http://mumbaipolice.maharashtra.gov.in/