Chaha

चहा

खरं तर गवती पात असली तर अजून काही मसाले घालायची गरज मला वाटत नाही.
आज mild मसाला चहा बनवला आहे.
उन्हाळ्यात असा बरा वाटतो.
आलं (किंवा सुंठ पावडर) आणि मिरी उष्ण असते ती वर्ज्य करून.
वेलची थंड असते म्हणून २ घातल्या आहेत.

१ कप

  • सर्वात आधी अर्ध्या कपापेक्षा थोडे जास्त पाणी गरम करत ठेवले.
  • गॅस मध्यम आहे.
  • मग त्यात १ लवंग, लहान तुकडा दालचिनीचा, २ वेलच्या कुटून त्यात घातल्या.
  • पाण्याला उकळी आली की अर्धा कप दूध घातले.
  • Oat milk वापरत असाल तर थोडे जास्त घाला.
  • आणि मग अर्धा चमचा चहा पावडर आणि १ चमचा साखर/ coconut palm sugar/ खडीसाखर घातली.
  • आता पुन्हा उकळी येई पर्यंत मोठ्या चमच्याने ढवळले, चहा स्टॉलवर करतात तसं.
  • आपल्या आवडीप्रमाणे आपण सगळ्याचे प्रमाण ठरवू शकता आणि किती वेळ उकळायचा तेही.
  • जर चहा जास्त आटला गेला तर थोडे दूध घालून १ कपभर होईल असे करा.
  • शेवटी गाळून घेऊन मग हवं तर किंचित केसरही घालू शकता.
  • आपला मसाला चहा तयार आहे.

Inspiration: Pankaj Tripathi