Bhaja Govindam – Marathi
भज गोविन्दं
हे संस्कृत भजन आदि शंकराचार्यांनी लिहिले आहे.
त्याच्या काही कडव्यांचा मराठीत अर्थ खाली दिला आहे.
•••••••••••••••••••••••••••
योगरतो वाभोगरतोवा
सङ्गरतो वा सङ्गविहीनः ।
यस्य ब्रह्मणि रमते चित्तं
नन्दति नन्दति नन्दत्येव ॥ १९॥
योगात रमणारा किंवा ऐहिक सुखात
संग बाळगणारा किंवा संगतीशिवाय ।
ज्याचे मन सत्यात रमते
फक्त तोच आनंदी राहतो ॥ १९॥
•••••••••••••••••••••••••••
यावत्पवनो निवसति देहे
तावत्पृच्छति कुशलं गेहे ।
गतवति वायौ देहापाये
भार्या बिभ्यति तस्मिन्काये ॥ ६॥
जोपर्यंत देहात प्राण आहे
तोपर्यंत सगळे कुशलमंगल विचारतात ।
जेव्हा प्राण देह सोडून निघून जातो
तेव्हा बायकोसुद्धा त्या देहाला घाबरते ॥ ६॥
•••••••••••••••••••••••••••
जटिलो मुण्डी लुञ्छितकेशः
काषायाम्बरबहुकृतवेषः ।
पश्यन्नपि चन पश्यति मूढः
उदरनिमित्तं बहुकृतवेषः ॥ १४॥
काही जटा वाढवतात तर काही केस कापतात
काही केस मोकळे सोडतात तर काही भगवे वस्त्र नेसतात ।
मूर्ख माणूस बघून न बघितल्यासारखं करत असतो
हे नाना वेष पोट भरण्यासाठी परिधान करत असतो ॥ १४॥
•••••••••••••••••••••••••••
काते कान्ता धन गतचिन्ता
वातुल किं तव नास्ति नियन्ता ।
त्रिजगति सज्जन संगतिरैका
भवति भवार्णव तरणे नौका ॥ १३॥
तू पत्नीची आणि धनाची चिंता का बरं करतोस
त्यांच्याविना तुझा कुणी वाली नाही का ।
तिन्ही जगात जर तुझी नौका जन्म-मृत्यूच्या सागरातून कुणी पार नेणारं असेल
तर तो म्हणजे सज्जनाचा संग होय ॥ १३॥
•••••••••••••••••••••••••••
मा कुरु धन जन यौवन गर्वं
हरति निमेषात्कालः सर्वम् ।
मायामयमिदमखिलं हित्वा
ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा ॥ ११॥
धनाचा जनाचा आणि यौवनाचा गर्व का करतोस
हे सर्व थोड्या काळात लुप्त होणार आहेत ।
ह्या सगळ्या मायेचा त्याग करून
तू ब्रह्मपदी प्रवेश कर आणि जाणता हो ॥ ११॥
•••••••••••••••••••••••••••
नारीस्तनभर नाभीदेशं
दृष्ट्वा मागामोहावेशम् ।
एतन्मांसवसादि विकारं
मनसि विचिन्तय वारं वारम् ॥ ३॥
स्त्रीचे भरलेले स्तन आणि नाभी
बघून तिच्या मोहात पडू नको ।
हे तन म्हणजे मांसाने वगैरे बनलेले आहे
हे तू वारंवार मनात आण ॥ ३॥
•••••••••••••••••••••••••••
कुरुते गङ्गासागरगमनं
व्रतपरिपालनमथवा दानम् ।
ज्ञानविहीनः सर्वमतेन
मुक्तिं न भजति जन्मशतेन ॥ १७॥
कुणी गंगा नदीकडे जातो
कुणी व्रतं ठेवतो, कुणी दान देतो ।
पण ज्ञानाशिवाय बाकी काहीच
शंभर जन्मानंतरसुद्धा मुक्ती देऊ शकत नाही ॥ १७॥
•••••••••••••••••••••••••••
प्राणायामं प्रत्याहारं
नित्यानित्य विवेकविचारम् ।
जाप्यसमेत समाधिविधानं
कुर्ववधानं महदवधानम् ॥ ३०॥
प्राणाचे नियमन करून, अन्य प्रभावांखाली न येता
चांगले वाईट जाणण्याची विवेकबुद्धी असू दे ।
खवळलेले मन देवाचा जप करून
अतिशय सावध राहून शांत कर ॥ ३०॥
•••••••••••••••••••••••••••
सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं
निस्सङ्गत्वे निर्मोहत्वम् ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्वं
निश्चलतत्त्वे जीवन्मुक्तिः ॥ ९॥
सत्संगाकडून नित्संगाकडे
नित्संगाकडून निरमोहाकडे ।
निरमोहाकडून निश्चलतेकडे
निश्चलतेकडून जीवनमुक्तीकडे जाता येते ॥ ९॥
•••••••••••••••••••••••••••
बालस्तावत्क्रीडासक्तः
तरुणस्तावत्तरुणीसक्तः ।
वृद्धस्तावच्चिन्तासक्तः
परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः ॥ ७॥
बालपण खेळण्यात
तरुणपण तरुणीसोबत ।
वृद्धापकाळ चिंतेत जातो
पण कुणीच ब्राह्मणावस्थेत राहत नाही ॥ ७॥
•••••••••••••••••••••••••••
पुनरपि जननं पुनरपि मरणं
पुनरपि जननी जठरे शयनम् ।
इह संसारे बहुदुस्तारे
कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥ २१॥
परत जन्म परत मरण
परत मातेच्या गर्भात राहणं ।
ह्या संसारसागरातून बाहेर पडणे अशक्य
हे मुरारी, तुझ्या कृपेने ह्यातून पार कर ॥ २१॥
•••••••••••••••••••••••••••
भजगोविन्दं भजगोविन्दं
गोविन्दं भजमूढमते ।
कृष्णाची आराधना कर, मुराऱ्याची पूजा कर
हे मूर्खा, गोविंदाची उपासना कर ।
•••••••••••••••••••••••••••