Atharvashirsha
॥ श्री गणपत्यथर्वशीर्ष ॥
ॐ नमस्ते गणपतये I
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि I
त्वमेव केवलं कर्तासि I
त्वमेव केवलं धर्तासि I
त्वमेव केवलं हर्तासि I
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि I
त्वं साक्षादात्मासि नित्यम् II 1 II
ऋतं वच्मि I सत्यं वच्मि II2II
अव त्वं माम् I अव वक्तारम् I अव श्रोतारम् I
अव दातारम् I अव धातारम् I
अवानुचानमवशिष्यं अव पश्चात्तात I अव पुरस्तात् I अवोत्तरात्तात् I
अव दक्षिणात्तात् I अव चौर्ध्वात्तात् I अवाधरात्तात् I
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात II 3 II
त्वं वाड्.मयस्त्वं चिन्मय: I
त्वामानन्दयस्त्वं ब्रम्हमय: I
त्वं सच्चिदानन्दाद्वितोयोSसि I
त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासि I
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि II4II
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते I
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति I
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति I
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति I
त्वं भूमिरापोSनलोSनिलो नभः I
त्वं चत्वारि वाक्पदानि II5II
त्वं गुणत्रयातीतः I त्वं देहत्रयातीतः I
त्वं कालत्रयातीतः I
त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यंम् I
त्वं शक्तित्रयात्मकः I
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् I
त्वं ब्रम्हा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रम्ह भूर्भुव:स्वरोम् II6II
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् I
अनुस्वारः परतर: I अर्न्धेन्दुलसितम् I
तारेण ऋद्धम् I एतत्तव मनुस्वरूपम् I
गकारः पूर्वरूपम् I अकारो मध्यमरूपम् I
अनुस्वारःश्चान्त्यरूपम् I बिन्दुरूत्तररूपम् I
नाद सन्धानम् I संहिता संन्धी: I
सैषा गणेशविद्या I गणक ऋषि: I
निचृद्गायत्री छन्द: I गणपतिर्देवता I
ॐ गं गणपतये नमः II7II
एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमही I
तन्नो दन्ती: प्रचोदयात् II8II
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमड़्कुशधारिणम् I
रदं च वरदं हस्तैबिभ्राणं मूषकध्वजम् I
रक्तं लंबोदरं शुर्पकर्णकं रक्तवाससम् I
रक्तगन्धानुलिप्ताड़ंग् रक्तपुष्पै: सुपूजितम् I
भक्तानुकम्पिनं देव जगत्कारणच्युतम् I
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरूषात् परम् I
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: II9II
नमो व्रातपतये नमो गणपतये
नम: प्रथमपतये नमस्ते S स्तू
लंबोदरायै एकदन्ताय विघ्ननाशिने
शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः II10II
– अथर्व ऋषी
मराठी भावार्थ
हरि: ॐ नमस्ते गणपतये I
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि I
त्वमेव केवलं कर्तासि I
त्वमेव केवलं धर्तासि I
त्वमेव केवलं हर्तासि I
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रम्हासि I
त्वं साक्षादात्मासि नित्यम् II 1 II
ॐ सामावलेल्या ‘गणेशा’ तुला माझा नमस्कार.
माझ्या डोळ्यानां दिसणारे परमेश्वरी रूप तूच आहेस.
हे जग तूच निर्माण केले आहेस.
तूच ते संभाळतोस आणि
तूच त्याचा संहार करणारा आहेस.
ब्रम्ह ही तूच आहेस आणि
आत्मा ही तूच आहेस ज्याचा नाश कधीच होणार नाही.
ऋतं वच्मि I सत्यं वच्मि II2II
मी मनापासून अनुभवतो की परमेश्वरावराचे खरे स्वरूप तूच आहेस.
अव त्वं माम् I अव वक्तारम् I अव श्रोतारम् I
अव दातारम् I अव धातारम् I
अवानुचानमवशिष्यं अव पश्चात्तात I अव पुरस्तात् I अवोत्तरात्तात् I
अव दक्षिणात्तात् I अव चौर्ध्वात्तात् I अवाधरात्तात् I
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात II 3 II
जे तुझे आणि वेदांचे ज्ञान देतात, जे ज्ञान घेतात त्या शिष्यांचे रक्षण कर.
सर्व बाजूंनी, सर्व दिशांनी तू माझे रक्षण कर म्हणजे माझ्या हातून तुझी उपासना घडेल.
त्वं वाड्.मयस्त्वं चिन्मय: I
त्वामानन्दयस्त्वं ब्रम्हमय: I
त्वं सच्चिदानन्दाद्वितोयोSसि I
त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासि I
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोSसि II4II
माझ्या अंतःकरणातील जागृत परमेश्वर तूच आहेस.
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते I
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति I
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति I
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति I
त्वं भूमिरापोSनलोSनिलो नभः I
त्वं चत्वारि वाक्पदानि II5II
हे दृश्य स्वरूपातील जग, विश्वनिर्मिती तुझीच आहे, तुझ्यामुळेच टिकून आहे आणि शेवटी तूझ्यातच विलीन होणार आहे.
ही भूमि…पृथ्वी, जल, प्रकाश, वायू आणि आकाश म्हणजे पंचमहाभूते तूच आहेस.
परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी ही वाणीची चारही रूपे तूझीच आहेत.
त्वं गुणत्रयातीतः I त्वं देहत्रयातीतः I
त्वं कालत्रयातीतः I
त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यंम् I
त्वं शक्तित्रयात्मकः I
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् I
त्वं ब्रम्हा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं चंद्रमास्त्वं
ब्रम्ह भूर्भुव:स्वरोम् II6II
श्री गणेशा –
गुण…तीन गुण : सत्त्व, रज व तम ह्या गुणांच्या पलीकडचा आहेस.
देह : स्थूल, सुक्ष्म व कारणमय ह्या पलीकडचा तू आहेस.
काळ : भूत, वर्तमान व भविष्य ह्या काळाच्या पलीकडचा तू आहेस.
नाभीमध्ये असलेले मुलाधार चक्र आणि तीन शक्ती : ईच्छा, ज्ञान आणि कार्य करण्याची शक्ती तुझ्यात आहे.
जन्म – मरण – जन्म या चक्रातून बाहेर पडून मोक्ष मिळविण्यासाठी ‘योगी’ तुझेच ध्यान, चिंतन, आराधना करतात.
सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव, पालनकर्ता विष्णू, संहारकर्ता रूद्र, वैभव उपभोगणारा इंद्र, प्रत्येक यज्ञात आहुती स्वीकारणारा अग्नी, सर्व सजीवांना जिवंत ठेवणारा वायू, प्रकाश देणारा सूर्य, वनस्पतींना जीवन देणारा चंद्र ही तुझीच रूपे आहेत.
ब्रम्ह स्वरूप पृथ्वी, अंतराळ, स्वर्ग आणि परब्रम्हाची जाणिव करून देणारा ‘ओंकार’ तूच आहेस.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् I
अनुस्वारः परतर: I अर्न्धेन्दुलसितम् I
तारेण ऋद्धम् I एतत्तव मनुस्वरूपम् I
गकारः पूर्वरूपम् I अकारो मध्यमरूपम् I
अनुस्वारःश्चान्त्यरूपम् I बिन्दुरूत्तररूपम् I
नाद सन्धानम् I संहिता संन्धी: I
सैषा गणेशविद्या I गणक ऋषि: I
निचृद्गायत्री छन्द: I गणपतिर्देवता I
ॐ गं गणपतये नमः II7II
गण … ग् + अ = प्रथम ग् अक्षर उच्चारून अ चा उच्चार करावा म्हणजे ‘ग’ आणि नंतर अनुस्वार व अर्धचंद्र गं … गँ…ॐकार ! हा बीज मंत्र ! या सर्वांचे एकीकरण नाद, स्वर, ॐ , गँ … म्हणजे संधी ! ही गणेश विद्या! ह्या गणेश विद्येचा अधिष्ठाता ‘गणक ऋषी’, गायत्री छंदात शब्दबध्द, गणपती देवता !
अशा ॐ गं गणेशाला माझा नमस्कार.
एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमही I
तन्नो दन्ती: प्रचोदयात् II8II
एक दन्त असलेल्या वक्रतुंड गणेशाला वंदन करीत त्याचे चिंतन करतो. हा आमची भक्ती आणि शक्ती वाढण्याची ईच्छा देवो.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमड़्कुशधारिणम् I
रदं च वरदं हस्तैबिभ्राणं मूषकध्वजम् I
रक्तं लंबोदरं शुर्पकर्णकं रक्तवाससम् I
रक्तगन्धानुलिप्ताड़ंग् रक्तपुष्पै: सुपूजितम् I
भक्तानुकम्पिनं देव जगत्कारणच्युतम् I
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरूषात् परम् I
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर: II9II
एक दात आणि चार हात असलेला, उजवीकडील वरच्या हातात पाश, खालच्या हाताने आशिर्वाद, डावीकडील वरच्या हातात अंकुश, उंदीर हे ध्वजचिन्ह , वाहन असणारा, विशाल उदर, वर शेंदूर , सूपासारखे कान, तांबडे वस्त्र धारण केलेला, रक्तचंदनाची उटी अंगाला लावलेला, तांबड्या फुलांनी पूजिलेला, भक्तांचा भुकेला, सृष्टीचा निर्माता, नाश न पावणा-या प्रकृतीच्या आधी जन्म पावलेला आणि आत्म्याहून श्रेष्ठ पुरूष असणा-या गणेशाचे जो नेहमी स्मरण करतो, भजतो, ध्यान करतो तोच श्रेष्ठ योगी होय.
नमो व्रातपतये नमो गणपतये
नम: प्रथमपतये नमस्ते S स्तू
लंबोदरायै एकदन्ताय विघ्ननाशिने
शिवसुताय श्री वरदमूर्तये नमः II10II
व्रातपतये – देवांच्या समुहाचा अधिपती.
गणपती – शिवाच्या म्हणजेच शंकर देवांच्या सेवकांचा, गणांचा अधिपती म्हणजे ‘गणपती’.
प्रमथपती- शंकराच्या भूत योनीतील सेवकांना ‘प्रमथ’ म्हणतात, त्यांचा अधिपती.
लंबोदर – लंब म्हणजे मोठे. उदर म्हणजे पोट. विश्वाचा पालनकर्ता, ज्याच्या उदरात अनेकांचे अनेक अपराध सामावलेले असल्याने ज्याचे उदर मोठे झाले आहे असा ‘लंबोदर’.
एकदन्त – एका आख्यायिके प्रमाणे युध्दात परशुराम बरोबर लढताना गणेशाचा एक दात मोडला आणि तोच मोडका दात शस्त्र म्हणून हाती घेतला म्हणून एकदन्त.
गणेश ही केवळ बुध्दीची देवता नसून शक्तीची पण आहे.
विघ्ननाशिन – विघ्न म्हणजे संकट याचा नाश करणारा.
शिवसुत – शंकरांचा पुत्र,
वरदमुर्ती – आशिर्वाद देणारी गणेश मुर्ती.
या गणेशाच्या आठ रूपांना माझा नमस्कार.
या सर्व रूपांतील भगवंत, गणेश म्हणजेच ‘परमात्मा’ तेच ‘परब्रम्ह’ याला माझा नमस्कार!
-दिलीप कुंभोजकर