Sanja

सांजा (उपम्याचा सोपा प्रकार तरीही तितकाच चविष्ट)

  • एका पॅनमध्ये अर्धा वाटी जाड रवा १ मोठा चमचाभर तूपासकट बारीक गॅसवर रव्याचा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा.
  • रवा छान भाजून झाला की बाजूला ठेवायचा.
  • एका लहान टोपात दीड ते दोन वाट्या पाणी उकळायला ठेवायचे.
  • दुसऱ्या गॅसवर एका कढईमध्ये फोडणीसाठी २ चमचे तेल तापवायचे त्यात आधी मोहरी मग जिरे, तीळ, तडतडले की हिंग आणि भाजलेला रवा घालायचा.
  • त्यात कडीपत्ता, हिरवी मिरची आणि हळद घालून पुन्हा परतायचा. गॅस मंद असू दे.
  • पाणी उकळले की कढईमध्ये ओतायचे आणि झाकण लगेच बंद करायचे कारण गरम वाफ आणि बुडबुडे तयार होतात.
  • थोड्या वेळाने पाणी आटले की परतायचं आणि थोडं मीठ घालून ढवळायचं. थोडा वेळ झाकण बंद ठेवायचे.
  • रवा छान फुलला की सांजा तयार झाला. त्यावर कोथिंबीर घालून सजवू शकता.

Video for reference: https://www.youtube.com/watch?v=ivg5FK_gZNg