Varan

वरण

  • तूर डाळ आधी धुवून मग १० मिनिटे पाण्यात भिजू दिली.
  • नंतर ते पाणी बदलले.
  • डाळीच्या दुप्पट पाणी, थोडी हळद, तेल आणि हिंग घालून कुकर मध्ये २-३ शिट्या देऊन शिजवली.
  • कुकर थंड झाल्यावर डाळ घोटून घेतली.
  • डाळीमध्ये चवीपुरते मीठ, गूळ घातले आणि डाळ घट्ट असल्यास थोडे पाणी.
  • शेवटी डाळीत तूप घातले आणि उकळी येऊ दिली.
  • वरण तयार आहे. भात त्याच कूकरमध्ये शिजवू शकता.
  • त्याबरोबर कांदा, मीठ घेतले.

आभार: https://youtu.be/1_1BDqaosLY