Oats Kheer

ओट्सची खीर
१ कप ओट्स (Scottish Jumbo Oats) धुवून पाण्यात काही तास भिजत ठेवले.
नंतर पाणी बदलून ओट्स १ कप गरम पाण्यात शिजत ठेवले.
आपण त्यात थोडे बदामाचे दूध किंवा साधे दूध घालू शकता.
५ मिनिटानंतर त्यात १-२ लहान गूळाचे खडे घातले.
१ लहान चमचाभर तूप घातले.
गूळ विरघळल्यावर गॅस बंद केला.
आपण साधे दूध वापरत असल्यास गॅस बंद केल्यावर गूळाची पावडर घालावी नाहीतर दूध फाटेल.
चिमूटभर वेलची जायफळ पावडर घातली.
थोडे बेदाणे घातले.
ओट्सची खीर तयार आहे.