Moogachi Khichdi

मूगाची खिचडी

पूर्वतयारी:

  • १ वाटी पिवळे मूग धुवून अर्धा तास भिजत ठेवले.
  • १ वाटी तांदूळ धुवून थोडा वेळ भिजत ठेवले.
  • अर्धी वाटी सुकं खोबरं आणि थोडे जिरे मिक्सरमधून वाटून घेतले.

कृती:

  • कुकर मध्ये तेलात मोहरीची फोडणी दिली.
  • मग त्यात हळद, तिखट घातले.
  • आता भिजवलेले मूग घातले. त्यातले पाणी घातले नाही.
  • त्यात गोडा मसाला, धणे पावडर, मिक्सरमध्ये वाटलेले सुकं खोबरं आणि जिरं घातलं.
  • आता भिजवलेले तांदूळ घालून परतलं. त्यातले पाणी घातले नाही.
  • आता मीठ, गूळ घातले.
  • तांदूळ आणि मूगाच्या 3 पटीपेक्षा १ कप जास्त गरम पाणी घातले. म्हणजे एकूण ७ वाट्या.
  • कुकरच्या ३ शिट्या होऊ दिल्या.
  • कुकर थंड झाल्यावर शिटी काढून वाफ जाऊ दिली.
  • खिचडी ढवळून वरून कोथिंबीर घालू शकता.

खिचडीवर तूप घालून त्याबरोबर कोशिंबीर, लोणचं किंवा पापड खाऊ शकता.

Videos for reference: